न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०१९) :- हिंद मित्र मंडळ सेवा ट्रस्ट अंकित श्री साई मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. २३) रोजी पिंपळे निलख येथे करण्यात आले आहे.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, सुनील शेळके, माजी आमदार प्रकाश देवळे, सांगवतील साई संस्थानचे अध्यक्ष दत्तात्रय लिहिणे आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सकाळी महाभिषेक, महाआरती, पालखी मिरवणूक, पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा होणार आहेत. तसेच सायंकाळी ह. भ. प. शंकरमहाराज शेवाळे यांचे कीर्तन होणार आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.












