न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०१९) :- चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते साडेचार या कालावधीत फिर्यादीला 6399761793 आणि 7467809160 या क्रमांकावरून फोन आले.
फोनवरील व्यक्तींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या एचएसबीसी बँक व जनता बँकेच्या कार्डची माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे फिर्यादी यांच्या परस्पर त्यांच्या खात्यावरून सुमारे १ लाख ६१ हजार ३५६ रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. याबाबत फोनवरील व्यक्तींविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












