- शहर मनसे व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचा सर्व्हे युद्धपातळीवरती करावा, अशी मागणी शहर मनसेचे अध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, आरपीआय वाहतूक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजीज शेख, रफीक खुरेशी, अध्यक्ष – समाजवादी पार्टी, लालासाहेब गायकवाड, अध्यक्ष अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समिती, संजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते, सुधीर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन व्हावे, त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सुमारे ७१ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम २०१७ साली ‘कँनबेरी’ कंपनीला दिलेले आहे. परंतु, दोन वर्ष होत आले तरीदेखील आजतागायत केवळ ५५ झोपडपट्ट्यांचा सर्वे करण्यात आला आहे. यामध्ये दिरंगाई होत. असून सर्व्हे व्यवस्थितरित्या होत नसल्याचा आरोप निगडी सेक्टर २२ मधील नागरिकांमधून होत आहे.
शहरातील संपूर्ण झोपडपट्ट्यांचा सर्व्हे युद्धपातळीवर करावा. सर्व्हेचे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर, शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाचा पवित्रा घेईल, अये या निवेदनात मनसेचे चिखले व सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.












