न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०१९) :- राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली होती व भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
मात्र, आज पुन्हा अनेपक्षित घडामोड होत, अजित पवार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिल्याची आज मंगळवारी घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप सरकार बनण्याआधीच कोसळलं आहे.















