न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०१९) :- भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, नगरसदस्य नामदेव ढाके, नगरसदस्या शारदा सोनावणे, अश्विनी चिंचवडे, अतिरिक्त आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, नगररचना उपसंचालक राम पवार, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनीही पुष्पंजली अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर पिंपरी चौकातील भिमसृष्टी परिसरात झालेल्या या कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. या वेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, नामदेव ढाके, नगरसदस्या शारदा सोनावणे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, संतोष जोगदंड, मनोज गडबडे, आदी उपस्थित होते.















