न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २२०१९) :- पी.एम.पी.एम.एल साठी ई बसेस व ई-चार्जिंग स्टेशन निर्माण करणाऱ्या चीन मधील कंपन्यांच्या शिष्टमंडळाने महापौर उषा उर्फ माई ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांची भेट घेवून त्यांना माहिती दिली. यावेळी पी.एम.पी.एम.एल च्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, नगरसदस्य सुरेश भोईर हे उपस्थित होते.
यावेळी या पथकाचे स्वागत महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि स्थायी समिती समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी केले. या कंपन्या ई बसेस, ई चार्जिंग स्टेशन तयार करीत असून कंपन्याच्या संचालकांनी ई बसेस, ई वाहने, पी.एम.पी.एम.एल इलेक्ट्रीक वाहने इ. करीता ई चार्जिंग स्टेशन तयार करणाऱ्या या प्रकल्पासाठी चार्जिंग स्टेशनचे कामकाज करणार असल्याचे यावेळी सांगितले. त्या संबधीत सविस्तर माहिती त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली असून या बाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ते लवकरच सादर करणार आहेत.
या शिष्टमंडळामध्ये झाओ झिनुआ, लि झिंग मिंग, रू योंग घेग, लियु युआन तसेच नागपूर येथील टॉपडोर कंपनीचे व्यवस्थापक डॉ. विशाल बाहेकर यांचा समावेश होता.












