न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २२०१९) :- आरोपी महेश आणि गणेश हे उपजिवीकेसाठी सांगवी पोलिस ठाण्याच्या समोरील चौपाटी भागात मिळेल ते काम करायचे. मात्र पैशासाठी त्यांनी सोनसाखळी चोरण्याकडे आपला मोर्चा वळवला.
पोलिसांना आपल्या कृत्याची माहिती कळाली हे समजताच दोन्ही आरोपींनी आपल्या राहत्या घरातून पळ काढला. यानंतर आरोपी महेश हा पिंपळे निलख परिसरात येणार असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचत महेशला अटक केली. महेशच्या चौकशीनंतर पोलिसांनी गणेशलाही ताब्यात घेतलं.
या दोन्ही आरोपींवर चोरीचे १० तर दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत. पोलिसांनी आरोपींजवळच्या दोन दुचाकी आणि इतर सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. महेश आपल्या आईच्या मदतीने चोरलेलं सोनं स्थानिक सोनाराकडे विकत असल्याचंही समोर आलं. महेश तुकाराम माने आणि गणेश हनुमंत मोटे अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी सोनारांकडचा मुद्देमालही ताब्यात घेतला आहे.












