- आमदार सुनील शेळकेंनी भाजपच्या संदीप शेळकेंचा घडवला राष्ट्रवादी प्रवेश….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २२०१९) :- मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव भाजपला खिंडार पडायला सुरुवात केली आहे. भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या तळेगावात सत्ताबदलाचे वारे वाहताना दिसू लागले आहेत. भाजपचे नगरसेवक संदिप बाळासाहेब शेळके यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्यामुळे नगरपरिषदेने स्पष्ट बहुमतही गमावले आहे.
संदीप शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर तळेगांव शहर अध्यक्ष गणेश काकडे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी उद्योजक किशोर आवारे, नगरसेविका अनिता पवार, नगरसेवक गणेश खांडगे, रोहित लांघे, आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे बंधु उद्योजक सुधाकर शेळके, संतोष शेळके आदी उपस्थित होते.












