न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २२०१९) :- फिर्यादी आणि त्याचा मित्र शाहूनगरकडे जात होते. यावेळी विरूद्ध दिशेने पिवळ्या ज्युपिटरवर आलेल्या आरोपीने फिर्यादीला अडविले. ‘तूम गांजा पिते हो क्या, तुम नशा करते हो क्या’ असे म्हणून तरूणांच्या हातांचा वास घेतला.
‘मै पोलीसवाला हू, तुम्हारे जेब मे जो है ओ बाहर निकालो, मुझे चेक करणेका है,’ असे म्हणून तरूणाला थोबाडीत मारून त्याच्या आणि मित्राकडील तीन मोबाईल, रोकड असा ५२ हजार ३०० रूपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुमच्याकडे पाहून घेऊन अशी धमकी देऊन पिस्तूल दाखविले.
ही घटना शाहूनगर येथे गुरूवारी (दि. २८) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी महमद नासमुल अहमद लष्कर (वय १८, रा कुदळवाडी, चिखली) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एमएच-१४, एच एक्स ३४७६) या क्रमांकाच्या दुचाकी चालक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार बागुल तपास करत आहेत.












