न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०१९) :- हैद्राबाद येथील २६ वर्षीय डॉ प्रियंका रेड्डी या तरुणीवर चार नाराधमाणे रात्रभर आत्याचार करून निर्घृणपणे हत्त्या केली व तिचा मृतदेह जाळून टाकला या घटनेचा निषेध करण्यासाठी आज चापेकर चौक, चिंचवड येथे युवक काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली सभा घेण्यात आली.
या सभेस पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल , पिंपरी चिंचवड काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, अनुजाती विभागाचे कार्याध्यक्ष – हिरामण खवळे, युवती सेल अध्यक्षा – विनिता तिवारी, सेवादलाचे अध्यक्ष मकरहवाज महिला काँग्रेसच्या शुभांगी निकम, नूतन शेळके , शहर युवक काँग्रेसचे वीरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, गौरव चौधरी, विशाल कसबे, चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, विठ्ठल कळसे, अक्षय शहरकर, सुभाष भुसने निशा काटे, नितु चामले आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
चापेकर चौकात हातात मेणबत्त्या घेऊन कँडल मार्च करून चापेकर पुतळ्याच्या जवळ श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे मयुर जयस्वाल, गौरव चौधरी शहाबुद्दीन शेख व महिला काँग्रेसच्या गिरीजा कुदळे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी गिरीजा कुदळे यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले आपल्या मुलींना यापुढे इंजिनिअर, डॉक्टर सोबत जिजाऊ राणी लक्ष्मीबाई देखील बनविण्याची गरज निर्माण झाली आहे, माणुसकीला काळिमा फासणारी घटनेचा जेवढा कराल तेवढा निषेध कमी आहे. आपल्या हातात शस्त्र घेण्याची व स्वताची , आपल्या माता भगिनींची रक्षण करण्याची वेळ आली आहे, त्या नाराधमाणा फाशी ही खूप छोटी शिक्षा असेल. असे कृत्य करणाऱ्यास भर रस्त्यावर शिक्षा दिली पाहिजे, न्यायालयाने त्याना त्वरित शिक्षा दयावी अशी मागणी महिला काँग्रेसचा वतींने करण्यात आली. शेवटी सर्वांनी 2 मिनिटे मौन पाळून स्थब्द उभे राहून श्रद्धांजली वाहिली. वि वॉन्ट जस्टीस्ट वि वॉन्ट जस्टीस्ट चा घोषणा देण्यात आल्या.
या कँडल मार्च चे आयोजन पिंपरी चिंचवड शहर युवक चे चंद्रशेखर जाधव आणि वसीम शेख यांनी केले.












