न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ डिसेंबर २०१९) :- मारूंजी येथील कोलते पाटील सोसायटी जवळील मोकळ्या मैदानात स्केटिंग शिक्षकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. निलेश नाईक असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथे मोकळ्या मैदानात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना बुधवारी सकाळी मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. मृतदेहाच्या जवळ बिअरच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यामुळे रात्री दारू पिल्यानंतर झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहे.












