न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०१९) :- श्रमणसंघीय युवाचार्य महेंद्रऋषिजी म. सा., प्रवर्तक प्रकाशमुनीजी म. सा. यांचा आकुर्डी – निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघाकडून चादर प्रदान करून सन्मान करण्यात आला. आकुर्डी येथील जैन स्थानकात हा कार्यक्रम झाला.
संघाचे अध्यक्ष जवाहर मुथ्था, कार्याध्यक्ष सुभाष ललवाणी, माजी अध्यक्ष संतोष कर्नावट, उपाध्यक्ष राजेंद्र खिंवसरा, प्रचार – प्रसार मंत्री राजेंद्र रातडिया, मंत्री प्रकाश मुनोत, विश्वस्त रमणलाल बाफना, सचिन गांधी, पोपटलाल कर्नावट, राजेंद्र छाजेड आदींच्या वतीने चादर प्रदान करण्यात आली. युवाचार्य महेंद्रऋषीजी, प्रवर्तक प्रकाशमुनीजी यांच्या समवेत उपस्थित संतांचे संघाकडून स्वागत करण्यात आले.
गुरूआनंद प्रार्थना मंडल, चंदनवाला महिला मंडल, ब्राह्मी मंडल, सुशील बह मंडल, यमुनानगर महिला मंडल, तसेच शाहूनगर, संभाजीनगर येथील जैन भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते.















