- मा. स्थायी समिती अध्यक्षा, ममता गायकवाड व मा. नगरसेवक विनायक गायकवाड यांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ डिसेंबर २०१९) :- वाकड परिसरात सोसायटी सभासदांसाठी गेली २ वर्षे वाकड प्रीमियर लीग म्हणून क्रिकेटचे सामने होत आहेत. चालू वर्षात हे सामने होऊ घातल्याने वाकड पिंपळे निलख मधील सोसायटी सभासदांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. या वाकड प्रीमियर लीगची सोसायटी सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता व चर्चा असते, या सामन्यांमध्ये महिलांची व पुरुषांची अशी टीम्स असतात यामुळे परिसरातील जवळ जवळ सर्व सोसायटीमधील सभासद यामध्ये सहभागी होऊन याचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटतात. वाकड प्रीमियर लीग करीता वाकड परिसरातील सोसायटींनी देखील मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे यावर्षीचा वाकड प्रीमियर लीग चा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता असते.
यावेळी बोलताना नंदन इंस्पेरा सोसायटीचे सभासद सचिन लोंढे म्हणाले कि “आमच्या सर्व आय टी वर्गासाठी एक खेळाचे वातावरण तयार करून एक नाविन्यपूर्ण उपक्रम विनायकदादांनी व ममताताईनी चालू केलेले आहे त्यामुळे आमच्या सोसायटी यावर्षीचा वाकड प्रीमिअर लीगचा क्रिकेट सामना आपल्याच सोसायटीने जिंकायचा या निर्धाराने आम्ही गेली २ महिने सराव करीत आहोत.”
मा.स्थायी समिती अध्यक्षा, ममताताई गायकवाड म्हणाल्या कि “वाकड परिसरात आय टी क्षेत्रातील सभासद मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व एक खेळाचे वातावरण तयार व्हावे याकरिता आम्ही २ वर्षांपूर्वी हा उपक्रम चालू केलेला होता. यासाठी आम्हाला सर्व सोसायटी मधील सभासदांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी ५४ टीम्स दुसऱ्या वर्षी टीम्स आलेल्या होत्या यावरून आपण या वाकड क्रिकेट लीगची उत्सुकता व ओढ समजू शकतो. यावर्षी जवळ जवळ १०० टीम्सच्या वर जाण्याचा आमचा अंदाज आहे त्यामुळे याचे नियोजनही मोठ्या प्रमाणात केलेले आहे व क्रिकेट सामन्यांचा सर्व सोसायटीने आनंद घ्यावा असे आवाहन आम्ही करतो”












