न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ डिसेंबर २०१९) :- देशातील पोलीस महासंचालक परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज पुण्यात आगमन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत झाले. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यावेळी पुणे विमानतळावर आले होते. त्यानंतर संजय काकडे यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला.
त्यावेळी संजय काकडे यांना अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लिन चीट देण्यात आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र येतील का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्याला उत्तर देताना काकडे म्हणाले की, सध्याची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता, मला तरी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील असे वाटत नाही. त्याचबरोबर ज्यात तीन पक्ष मोट बांधत राज्यात सत्ता स्थापन केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार टिकेल, तसेच त्यांना हे सरकार टिकावावेच लागेल, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. ज्याप्रमाणे १९८९ साली शरद पवार यांनी सरकार चालवले होते.















