न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसेंबर २०१९) :- अंजली यांनी त्यांच्या घरातील जुना फ्रीज विकण्याची ओएलएक्स या संकेतस्थळावर जाहिरात दिली. ही जाहिरात पाहून अज्ञात आरोपीने 7636868941 या क्रमांकावरून अंजली यांना फोन केला. अंजली यांचा फ्रीज आपल्याला घ्यायचा आहे. त्याचे पैसे ऑनलाईन देतो, असे अंजली यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
आरोपीने अंजली यांच्या मोबाईलवर एक क्युअर कोड पाठवला. हा कोड स्कॅन केल्यास त्यांना पैसे मिळणार असल्याचे सांगितले. तसेच अंजली यांच्या मोबाईल फोनवर एक लिंक पाठवून त्यावर क्लीक करण्यास सांगून त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यामधून ४९ हजार ९८६ रुपये काढून घेत अंजली यांची फसवणूक केली.
अंजली श्रीकांत अहिरराव (वय ५२, रा. सुकासा सोसायटी, दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 7636868941 मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी एक ते चार या कालावधीत ही घटना घडली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.















