न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०१९) :- पिंपळे गुरव, प्रभाग क्र. २९ मध्ये (दि. ११ व १२) रोजी अनधिकत बांधकाम विरोधी कारवाई करण्यात आली. पिंपळे गुरव परिसरातील ८ आरसीसी अंदाजे क्षेत्रफळ ५५००. ०० चौ. फुटाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणेत आली.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ ड ‘ प्रभाग यांच्या पथकाने केली. सदर कारवाईत १ जेसीबी, १ डंपर, तसेच १० मजूर, ४ मनपा अधिकारी व १० मनपा पोलीस कर्मचारी, यांच्या सहकार्याने करण्यात आली, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.















