न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहराची पीएमपीएमएल बस सेवा, नॉन मोटाराईज ट्रान्सपोर्ट, बीआरटी, सीपीएम आणि मेट्रो या वाहतुकीशी संबंधित कामकाजाकरिता महापालिकेत ‘परिवहन कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाची जबाबदारी कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, वाढते भौगौलिक क्षेत्र तसेच वाढणारी वाहनांची संख्या यामुळे पुढील काळात वाहतूक विषयांचे महत्व आणि प्राथमिकता वाढणार आहे.
कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे परिवहन कक्ष प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता विजय सोनवणे यांच्याकडे उपभियंता पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. सोनवणे यांच्यासह उपअभियंता संजय साळी आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता अनिल भोईर यांची परिवहन कक्षात बदली करण्यात आली आहे.












