- माजी मंत्री राम शिंदेच्या टीकेला शहर युवक काँग्रेस चे प्रतिउत्तर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०१९) :- भारतीय जनता पार्टी चे माजी मंत्री राम शिंदे हे नुकतेच पिंपरी चिचंवड शहरात आले असताना काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहूल जी गांधी यांच्या वर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केली. याचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने पत्रक काढून जाहीर निषेध करण्यात आला.
राम शिंदे यांनी टीका करताना राहूल गांधींच्या जन्माचा मुद्दा मांडला व त्यांनी राहूल गांधी ना भारतीय संस्कृती माहीत नाही. ते हायब्रीड व्हर्जन आहेत व ते इंडो- ईटालियन व्हर्जन आहेत, अशी टीका केली. सावरकरांबद्दलच्या राहूल गांधीं च्या वक्तव्याविरोधी शिंदे यांना टिका करावयाची होती तर ती वास्तविक मुद्यांच्या आधारे करणे योग्य ठरले असते. मात्र, शिंदे यांनी तसे न करता थेट खालची पातळी गाठत आपल्या अकलेचे तारे तोडल्याचे वरिल वक्तव्यावरून दिसून आले आहे.
विचारांना-विचारांनी उत्तर देण्याची क्षमता नसणारे लोक असे वैयक्तिक स्वरूपाच्या टिका टिप्पणी करतात व मूळ मुद्यावरून दिशाभूल करतात हाच भाजपाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेच्या समोर आला आहे.
राहूल गांधी हे राजीव जींचे म्हणजेच एका शहीदाचे पुत्र आहेत व देशासाठी प्राण द्यावे लागलेल्या आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते दिवस रात्र झटत आहेत. देशभर फिरून ते देशातील एकात्मतेसाठी लढत आहेत. अन्यायविरोधी आंदोलने करत आहेत. शेतकरी, गोरगरीब, पिडीत, शोषित, दिन, दूर्बल या सर्वांचे अश्रू पुसण्याचे काम करणा-याला या देशाची संस्कृती माहीत नसेल का? माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो हि साधी बाब शिंदे यांना माहीत नसावी याची किव येते व केवळ प्रसिध्दीसाठी बड्या व्यक्तीवर टिका करणे हे शिंदे च्या मनोवृत्तीचे दर्शन घडवते.
आजवरच्या वाटचालींने व कर्तृत्वाने राहूलजींनीं संपूर्ण विश्वाला दाखवून दिले आहे कि त्यांचे रक्त हे देशभक्त व त्यांची ब्रीड ही त्याग,बलिदान,समर्पण व सेवाभावाचीच आहे. राम शिंदे हे पराभूत झाल्याने व एकंदरीतच त्यांचे राजकारण संपूष्टात आल्याने ते नैराश्यात आहेत व त्यातूनच असे प्रसिद्धी चे प्रयत्न ते करत असावेत, जनहीताची कामे मतदारसंघात करणे त्यांना जमले नसल्याने जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे याबाबत चे प्रथम आत्मपरीक्षण करावे असा खोचक सल्ला हि युवक काँग्रेस च्या वतीने देण्यात आला आहे.












