न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०१९) :- सूर्यकांत सुदाम तनपुरे यांची स्विफ्ट कार (एम एच १२ / जी आर ११५५) मागील तीन दिवसांपासून त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. तर परशुराम खेळकर यांनी त्यांची मोपेड दुचाकी (एम एच १२/ क्यू सी १५४५) सोमवारी रात्री घरासमोर पार्क केली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञातांनी ही दोन्ही वाहने पेटवून दिली.
शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि वाहन मालकांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून दोन्ही वाहनांची आग विझवली. मात्र, तोपर्यंत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री साडेअकराच्या सुमारास सिद्धिविनायक पार्क, कॉलनी क्रमांक एक, दत्तनगर, दिघी येथे घडली. दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.












