न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०१९) :- आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या आवारात विविध ठिकाणी पाणी साचले आहे. टाक्यांमध्ये पाणी साचले आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती होत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज (मंगळवारी) पाहणी केली असता या साचलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेंगूच्या अळ्या सापडल्या. कॅम्पसमध्ये अनेक ठिकाणी डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. त्यामुळे महाविद्यालयाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रॉय यांनी सांगितले.
आकुर्डीतील डॉ. डी.वाय पाटील महाविद्यालयात आज तपासणी केली. त्यावेळी अनेक ठिकाणी या साचलेल्या पाण्यामध्ये डेंगूच्या अळ्या सापडल्या आहेत. एवढ्या मोठ्या संस्थेत हलगर्जीपण योग्य नाही. यामुळे अनेकांना डेंगूची लागण होत आहे. त्यांनी अळ्या नष्ट कराव्यात. त्याचबरोबर शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी परिसराची तपासणी करावी. डेंगूच्या अळ्यांची उत्पत्ती ठिकाणे नष्ट करावेत. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य अधिकारी डॉ. रॉय यांनी दिला आहे.












