न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अखत्यारित आठ रुग्णालये व २८ दवाखाने कार्यरत आहेत. या दवाखान्यांमध्ये शहरातील गरीब व गरजू रुग्णांवर उपचार केले यांना जातात. हे दवाखाने सकाळी आठ वाजता सुरू होतात.
सकाळी रुग्णांचा प्रतिसाद कमी असल्याने या वेळेत बदल करून दवाखाने सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेचे रुग्णालय व दवाखान्यांमध्ये रुग्णांवर औषधोपचार व्यतिरिक्त शासकीय योजनांचा लाभ देणे, राजीव गांधी योजना राबविणे अशा सुविधा पुरविल्या जातात.
नागरिकांच्या सोयीसाठी दुपारी एक वाजेपर्यंत दवाखाने सुरू असतात. त्यानंतर दवाखान्यातील डॉक्टरांना राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत येणारे कामकाज तसेच कुटुंब कल्याण अंतर्गत येणाऱ्या सभा कार्यक्रमांना जावे लागते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.















