न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- रात्रीच्या वेळी महिला समजून मदतीच्या उद्देशाने लिपट देणे एका नागरिकाला चांगलेच महागात पडले. लिफ्ट मागून मोटारीत बसलेल्या तीन महिला चोरट्यांनी मोटार चालकास लुटले. ही घटना प्राधिकरण येथे घडली.
तपासात या महिला नसून ततीयपंथी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेश नानासाहेब देशमुख (वय ४९, रा. दत्तवाडी, आकर्डी) यांनी बुधवारी (दि. १८) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी तीन महिला चोरटयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि. १७) रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी देशमुख हे आपल्या मोटारीतून घरी चालले होते. ते प्राधिकरणातील बंद बीआरटी रस्त्याजवळ असलेल्या कृष्णा हॉटिल समोर आले . त्यावेळी त्यांना तीन महिलांनी लिफ्ट मागितली. त्यानंतर त्या महिला मोटारीत बसल्या. देशमुख यांना ब्लेडचा धाक दाखवून त्याच्याकडील चार तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, सोनसाखळी व रोख रक्कम असा ९५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. तपास करताना आरोपी महिला नसून तृतीयपंथी असल्याचे समोर आले आहे.












