न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची डिसेंबर महिन्याची नियोजित सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी होती. ही सभा तहकूब झाली. तहकूब सभा ६ जानेवारी २०२० पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. महापौर माई ढोरे यांची ही पहिलीच सभा होती.
शहरातील घटनांमध्ये मृत पावलेले नागरिक, सिमेवर लढताना शहिद झालेले जवान, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू आदी दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून ही सभा तहकूब करण्यात आली.















