न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०१९) :- लहान मुले घरासमोर खेळायला कशाला पाठवतेस असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच महिलेला मारहाण करून लहान मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. थेरगाव येथे सोमवारी (दि. १६) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मनीषा राजू परदेशी (वय २८, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रईस रफिक मोमीन, आशु रईस मोमीन (रा. थेरगाव) व हिना फिरोज मोमीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रईस याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी परदेशी यांची लहान मुले रस्त्यावर खेळत होते. तुझी लहान मुले आमच्या घरासमोर खेळायला कशाला पाठवतेस असे म्हणून आरोपी यांनी फिर्यादी परदेशी यांना शिवीगाळ केली. हाताने मारहाण केली. तसेच त्यानंतर लहान मुलाला ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. त्यानंतर रस्त्यावर पडलेली वीट डोक्यात मारून फिर्यादी परदेशी यांना जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.















