न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०१९) :- काळेवाडी येथे भरदिवसा बर्निंग कारचा थरार झाला आहे. काळेवाडीकडून पिंपरीकडे येणा-या कारला आग लागली आहे. ही घटना रविवारी (दि. २२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीकडून पिंपरीच्या दिशेने येत असलेल्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास काळेवाडी येथील डी मार्टजवळ घडली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. आग आटोक्यात आली आहे.















