न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामगार विभागाच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त अटोक्लस्टर चिंचवड येथे सुशासनदिन म्हणून साजरा करण्यात आला.
आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या वर्ग ४ मधून लिपीक संवर्गांत नियुक्ती झालेल्या कर्मचा-यांसाठी ताणतणाव मुक्ती व कामाचे व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन कामगार कल्यान अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले.
प्रायाणिक हिलींग पुणे, या संस्थे मार्फत प्रशिक्षक विजय खानके यांनी ताणतणावा पासून कसे मुक्त व्हायचे या बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण शिबिरात महापालिकेच्या सूमारे सूमारे ६० कर्मचा-यांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामुळे कामाची गती वाढून व्यक्तीगत विकास होवून गुणवत्ता पूर्ण काम होण्यास कर्मचा-यांना मदत होणार आहे.












