न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०१९) :- जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला. या अपघात १५ विद्यार्थी, ३ शिक्षक आणि बसचालक जखमी झाले आहेत. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे परिसरात हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त एसटी बस संगमनेर तालुक्यातील बी. जे. खताळ विद्यालय, धांदरफळ येथील विद्यार्थ्यांना घेऊन सहलीला गेली होती. या बसमधून ४४ विद्यार्थी प्रवास करत होते.
सहलीवरुन परतत असताना पहाटे चारच्या सुमारास तळेगाव दाभाडे परिसरात रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या ट्रक्टरला बसने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील १५ विद्यार्थी, ३ शिक्षक आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.












