न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०१९) :- सांगवीतील नामदेव शंकर ढोरे (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. महापौर उषा ढोरे यांचे ते दीर होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नामदेव ढोरे यांच्या पार्थिवावर जुनी सांगवी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अध्यात्मिक, सहकार, सामाजिक, राजकीय, कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.















