न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०१९) :- अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची नुकतीच बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा का सुरु केला? असा जाब आयुक्त हर्डीकर यांना विचारला.
यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणी कपातीची सविस्तर कारणे सांगत, दररोज जास्त दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला ३० एमएलडी जादा पाण्याची आवश्यकता आहे. ३० एमएलडी पाणी कोठून उपलब्ध करायचे. त्यावर विचार करावा लागेल.
त्यासाठी किमान ३० ते ३५ एमएलडी जादा पाण्याची आवश्यकता आहे. वाघोली पाणीपुरवठा योजना किंवा पवना धरणातूनही जादा पाणी मिळाले तरी चालेल. धरणातून सध्या पाणी उचलण्याची क्षमता नाही. त्याचे काम चालू केले आहे, असे सांगितले.















