न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जानेवारी २०१९) :- दैनिक प्रभात पिंपरी चिंचवड आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त आज बुधवारी (दि. १) रोजी न्यूज पीसीएमसीचे संपादक अशोक लोखंडे व प्रतिनिधी संतोष जराड यांनी प्रभातच्या पिंपरीतील आंबेडकर चौकातील पिंपरी चिंचवड जाहिरात विभागास सदिच्छा भेट दिली.
यावेळी उपस्थित प्रतिनिधींना वर्धापन दिनानिमित्त पुष्पगुच्छ देत, वर्धापन दिनाच्या शुभेच्छ्या दिल्या. या प्रसंगी प्रभातच्या वरिष्ठ अधिकारी मनीषा जोशी, मनीषा राजे, संदीप बधाले आदी यावेळी उपस्थित होते.












