न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जानेवारी २०१९) :- स्वातंत्र्यसुर्य हुतात्मा विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांच्या ७७ व्या पुण्यतिथी निमित्त भाई कोतवाल चौक, दापोडी येथे पुष्पहार पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक रोहीत आप्पा काटे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
यावेळी बलुतेदार संघाचे प्रदेशाअध्यक्ष रामदास सूर्यवंशी, सचिव राजेंद्र पंडित, शहराध्यक्ष राजेश भोसले, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे निवड समिती प्रमुख व निरीक्षक प्रदीपनाना वाळुंजकर,पर्वती विम.संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भोसले, सुजित मगर, प्रभाकर आदी उपस्थित होते.
यावेळी रामदास सूर्यवंशी यांनी स्मारकासाठी १० लाख रूपये मंजूर निधीतून काम लवकर चालू करण्याची मागणी केली. पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक रोहीत आप्पा काटे म्हणाले की स्मारकासाठी १० लाख दिले तांत्रिक अडचणी मुळे हे काम पूर्ण करण्यात वेळ लागला पण आता ते लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी झटणार आहे. प्रदीप वाळुंजकर म्हणाले की, भाई कोतवाल यांचा पुतळा उभा करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा आम्हीदेखील त्यादुष्टीने पुढाकार घेऊ असे स्पष्ट केले.
यावेळी राजेश भोसले, राजेंद्र पंडित यांनी विचार मांडले. आभार महा. पोलीस खुशाल वाळुंजकर यांनी मानले.















