न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील कार्यालयीन सचिव रामदास मोरे (वय ६५) यांचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवारी (दि. २) दुपारी साडेबाराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली.
याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा-पुणे लोकलची (९९८११) धडक लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले माही.
रामदास मोरे अविवाहित होते. मागील अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यालयात कार्यालयीन सचिव म्हणून कार्यरत होते.















