न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत चिखली-देहू-आळंदी रोड येथे गुरुवारी (दि. २) रोजी अनधिकृत अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपायुक्त निलिमा जाधव, पोलीस पी. आय. दिलीप भोसले, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत चिखली पोलिस स्टेशन येथील स्थानिक पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
महापालिका अतिक्रमण पथक, ०१ क्रेन, ०७ डंपर, मनपा कर्मचारी व मजूर यांचे सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. यापुढेही संयुक्तपणे वारंवार कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे.















