न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जानेवारी २०१९) :- शिवसेना गटनेते व पीएमआरडीएचे उपाध्यक्ष राहुल कलाटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निर्भया फाउंडेशनच्या वतीने प्राण्यांसाठी सुरू केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम रहाटणी-पिंपळे सौदागर, कोकणे चौक येथे संपन्न झाला. तसेच वाल्हेकरवाडी येथे सुरू केलेल्या पाळीव प्राणी निवाऱ्याचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी राहुल कलाटे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शीतल मुकणे, कंपेशन फॉर ऑल च्या अध्यक्षा पुनीता खन्ना, अनिकेत मेमाणे, श्री गर्ग, महाराष्ट्र प्राणी वेलफेअर असोसिएशनच्या सल्लागार नेहा पंचमिया, डॉ प्रशांत चेन्नई, कोकणे चौक जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक शरद कोकणे, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष वसंत कोकणे, निर्भया फाउंडेशनचे संस्थापक/ अध्यक्ष उल्हास कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कलाटे म्हणाले की, “आपण आपल्या आरोग्याची जशी काळजी घेतो. तशीच प्राण्यांची घेतली पाहिजे. भूतदया म्हणून निर्भया फौंडेशनने जो उपक्रम राबविण्यात आला आहे तो अतिशय स्तुत्य आहे, अशा शब्दात कौतुक केले.
उल्हास कोकणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच पाळीव व भटक्या प्राण्यांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध केलेली आहे. तसेच भटके प्राणी जखमी असल्याची नागरीकांकडून माहिती मिळाल्यास संस्थेतर्फे प्राण्यांवर उपचार केले जाईल. भटक्या प्राण्यांवर मोफत उपचार असेल. श्वान व मांजर यांचा समावेश आहे. रेबीजसारखे लसीकरण किंवा निर्बीजीकरण केले जाईल.
यावेळी प्राणीमित्रांना स्मृतिचिन्ह व टी शर्ट देवून विशेष सन्मान करण्यात आला. प्राण्यांवर आधारित असलेल्या गीताचा मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत गुंड, देवा नखाते, राकेश नखाते, प्रिया खिल्लाड, शिल्पा अनपान, अनिता तुतारे, योगिता चौधरी, वैशाली मराठे, प्रियांका जैन, भाग्यश्री म्हस्के, अमृता सुपेकर, अमय नेवरेकर, विकास एकशिंगे, अमर तांबे, हनुमंत नखाते, बालाजी वाघे, युनिस मुलाणी, दादा इंगवले यांचे विशेष सहकार्य लाभले.















