न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ब क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १६ मधील किवळे येथे आज शुक्रवारी (दि. ३) रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
सदर कारवाईमध्ये आर. सी. सी. ०६ बांधकामे निष्कासित करण्यात आले. सदर अनधिकृत बांधकामाचे एकुण क्षेत्रफळ ११७२८. ४० चौ. फुट बांधकाम (१०९० चौ. मी.) आहे. सदर कारवाई कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता अनिल शिंदे, ०१ कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांचे पथकाने केली.
या सदर कारवाईत २ जे. सी. बी., १ पोकलेन व २० मजुर मनपाकडील १४ पोलिस कर्मचारी, देहुरोड पोलिस स्टेशन येथील ०२ पोलीस कर्मचारी तसेच मनपाकडील अतिक्रमणाचे १ वाहन, यांच्या बंदोबस्तमध्ये कारवाई करण्यात आली.अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.















