- पिंपरी चिंचवड अॅड बार असोशिएशन यांच्या प्रयत्नांना यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड अॅड बार असोशिएशनच्या प्रयत्नांना यश आले असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नवीन न्यायालयीन इमारतीच्या फर्निचरकरीता ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे नवीन न्यायालयाच्या अंतर्गत कामकाजाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
बार असोसिएशनच्या कार्यकारिणीने नवीन न्यायालयाच्या फर्निचरकरीता मंजूर झालेल्या ५ कोटी रुपयांच्या मंजुरीची प्रत मे. जिल्हा न्यायाधीश साहेब यांच्याकडे सोपविली आणि लवकरात लवकर नवीन न्यायालय सुरू करावे, अशी विनंती केली.
त्यावेळी पिंपरी चिंचवड अॅड बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. दिनकर बारणे, सचिव अॅड. हर्षद नढे पाटील, उपाध्यक्ष अॅड. अतुल अडसरे, महिला सचिव अॅड. बिडकर मॅडम, अॅड.आतिष लांडगे आणि सदस्य अॅड. राजेश रणपिसे व अॅड. अनिल पवार हे उपस्थित होते.
मा. जिल्हा न्यायाधीश धोटे साहेब यांनी देखील लवकरच न्यायालयाच्या कामकाजास सुरवात होईल, अशी सकारात्मक माहिती दिली दिली. या भेटीमुळे अनेक वर्षपासून प्रलंबित असलेला न्यायालयाचा प्रश्न नक्की सुटेल असा आशावाद इतर वकिलांनी व्यक्त केला.















