न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जानेवारी २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १४ तोळे सोन्याचे दागिने असा एकुण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिल कुकरेजा वय-४३ असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तो सिंधी समाजाच्या व्यक्तीच्या घरी मिळेल ते काम करून नोकरी करायचा. त्यांचा विश्वास संपादन करून दोन-तीन महिन्यांनी त्यांच्या घरी चोरी करून निघून जायचा. त्यानंतर पुन्हा दुसरा काम मिळवण्यासाठी अन्य एका सिंधी समाजाच्याच व्यक्तीचा शोध घ्यायचा, असं पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीवर जळगाव येथे विविध गुन्हे दाखल आहेत. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.