न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जानेवारी २०१९) :- महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बाला रफिक शेखला चितपट करत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने बाजी मारली आहे. गतवर्षी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत बाला रफिक शेख हा विजयी ठरला होता. यावर्षीही सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने बाला रफिक शेखला आस्मान दाखवलं आहे आणि उपांत्य फेरीत त्याचा पराभव केला आहे.
अवघ्या सव्वा मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर जमदाडेने बाला रफिक शेखला चितपट केलं आहे. बाला रफिक शेख हरल्यामुळे तो स्पर्धेबाहेर झाला आहे. बाला रफिख शेख हरल्याची बातमी समोर येत असतानच अभिजित कटके हा देखील उपांत्य फेरीत हरला आहे. त्यामुळे अभिजित कटके आणि बाला रफिक शेख हे दोन्ही मल्ल स्पर्धेबाहेर गेले आहेत.















