न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जानेवारी २०१९) :- गुप्ता यांचे हॉटेल कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप उचकटून हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमधील एक लाख २७ हजार २०० रुपये तसेच दारुच्या बाटल्या चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना मंगळवारी (दि. ७) पहाटे काळभोरनगर, चिंचवड येथे घडली.
राजकुमार पंचानंद गुप्ता (वय ३५, गंगानगर, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












