न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०१९) :- कॉफी प्यायला जायचे आहे, असे सांगून आरोपी याने फिर्यादी महिलेची दिशाभूल करून तिच्या इच्छेविरूद्ध तिला पळवून नेले. बावधन येथे पाच ते सहा दिवस थांबविले. त्यानंतर कोल्हापूर येथे घेऊन गेला. तेथे ३ जानेवारी २०२० रोजी धमकी देऊन फिर्यादी यांच्या इच्छेविरूद्ध त्यांच्याशी विवाह केला. फिर्यादी यांनी त्यांच्या भावाला फोन केल्याच्या कारणावरून आरोपी याने त्यांना मारहाण केली.
त्यानंतर त्यांना कराड येथे घेऊन गेला. तेथे एक दिवस थांबून पुन्हा पुण्यात आला. पुण्यात एका हॉटेलमध्ये असताना फिर्यादी महिला यांनी त्यांच्या भावाला मोबाइलवरून संदेश पाठविला. भाऊ आल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली.
याप्रकरणी २३ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी याने खोटे सांगून फिर्यादी महिला त्यांच्या पतीकडे असताना त्यांना पळवून नेऊन आरोपी याने त्यांच्याशी विवाह केल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अमित नंदू भूमकर (वय २८ , रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.












