न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील नवोदित, नाविन्यपूर्ण उद्योजकांना कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटीअंतर्गत शहर परिवर्तन कार्यालयामार्फत युवा उद्योजकांना प्रोत्साहन देत, नवीन उद्योजक घडविण्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय फेस्टिवल ऑफ द फ्युचर’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी (सोमवारी) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी महापौर उषा ढोरे उपस्थित होत्या. २८ आणि २९ फेब्रुवारी २०२० रोजी होणा-या उपक्रमा अंतर्गत हॅकेथॉन, पीचफेस्ट, नव उद्योजकांनी निर्माण केलेल्या संकल्पनांचे प्रदर्शन, नामांकित व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे. या उपक्रमात शहरातील एक हजार स्टार्टअप उद्योजक सहभागी होण्याची शक्यता आहे. शहरातील २० नाविन्यपूर्ण स्टार्टपसच्या उद्योजक व्यावसायिक प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. त्यातून नव उद्योजकांना प्रेरणा मिळेल. शहराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात भर पडेल, असे आयुक्त हर्डीकर म्हणाले
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मुख्य कार्यालय असणार आहे. हा महोत्सव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात येणार आहे. महोत्सवाचे अर्ज www. festivaloffuture.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.













