- श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात महा WALKATHLON २०२० यशस्वीरीत्या संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०१९) :- चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय आणि पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महा WALKATHLON 2020 यशस्वीरीत्या संपन्न झाला.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सुरक्षा नियमांबद्दल जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय आणि पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवार (दि. १४/०१/२०२०) रोजी महा WALKATHLON 2020 चे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.आनंद पाटील साहेब यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी सहाय्यक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसिकर साहेब, RTO इन्स्पेक्टर सचिन विधाते, प्रवीण खेडकर, विद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जाधव, संचालक विजय जाधव, संचालक अमित बच्छाव, प्राचार्य बाळाराम पाटील, प्राथ. विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा देशपांडे, उपमुख्याध्यापक किसन आहिरे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाच्या शाहूनगर येथील क्षात्रवीर संभाजीराजे क्रीडांगणापासून शाहूनगर परिसरात RALLY काढण्यात आली. यात विद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि रस्ता सुरक्षेसंदर्भात विविध घोषणा देऊन सर्वांचे लक्ष रस्ता सुरक्षेकडे वेधून घेतले. परिवहन कार्यालयाचे अनेक अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. तसेच MPSC परीक्षेत नुकतेच यशस्वी झालेल्या अनेक नवनिर्वाचित अधिकाऱ्यांनीही घोषणा देत या कार्यक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवला.
पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात अत्यंत साध्या, सोप्या व रंजक भाषा शैलीत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबद्दल माहिती सांगितली. पूर्वीच्या तुलनेत आता दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे. रस्त्याने चालताना विद्यार्थी व पालकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
सहा. उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसिकर यांनी विद्यालयातील भौतिक व शैक्षणिक सुविधांचे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता व प्रगतीकरिता सतत जागरुक असणाऱ्या संस्थापक-अध्यक्ष श्री. आण्णासाहेब जाधव यांचे विशेष कौतुक केले. रस्ता सुरक्षेबद्दल घ्यावयाच्या काळजीबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सतत सतर्क राहण्याचे आव्हान या प्रसंगी केले. याप्रसंगी काही गुणवंत व आदर्श विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यालयाच्या वतीने विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सौ. लीला मुटकुळे, रमेश ढवळे, श्रीम. मुबारक मोमीन, अजिनाथ गुराळकर, शरद पटेल, मास्टर ट्रेनर वेलू यांनी उपस्थित मान्यवरांना विद्यालयातील अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. दत्तात्रय भालेराव यांनी केले, तर क्रीडाशिक्षक शब्बीर मोमीन यांनी सूत्रसंचलन केले.















