न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०१९) :- रावेत येथील आंबेडकर चौकात सध्या बरीच वाहतूक वाढलेली आहे. त्यातच शनिवारी आठवडे बाजार भरत असल्यामुळे चौकामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे. पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाणे कठीण होत आहे.
चौकांमध्ये सिग्नल बसून अनेक वर्ष झाली. अद्याप सिग्नल चालू का होत नाहीत याचे कारण समजू शकत नाही. संबंधित वाहतूक नियंत्रण शाखेने आंबेडकर चौकातील सिग्नल ताबडतोब चालू करावेत आणि वाहतुकीचे नियोजन करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.















