न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०१९) :- पाच वर्षांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांनी माझ्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली नसती, तर कदाचित हा भाऊ तुम्हाला लक्षात पण आला नसता, दिसलाही नसता. माझ्यातील जे कर्तृत्व आहे ते सुद्धा पहायला मिळालं नसतं असे भावनिक उद्गार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले आहेत.
२०१४ ला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसणारा, खलनायक असे म्हणायचे. मात्र जसंजसं काम होत गेलं तसं धनंजयचा धनुभाऊ झाल्याचे त्यांनी सांगितलं.
परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री पदी विराजमान झालेल्या धनंजय मुंडे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या बीड, परळीतील नागरिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी रावेत येथे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पुण्यात वास्तव्याला असणाऱ्या बीडकरांनी मोठी गर्दी केली होती.















