न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०१९) :- चिंचवडमधील पूर्णानगर येथील खाणीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन चिखली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. खाणीमधील पाण्याच्या बाहेर मयत महिलेच्या चपला आहेत. ही घटना आज, सोमवारी (दि. २०) रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. महादेवी कोरे (वय ६१, रा. शाहूनगर, चिंचवड) असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव आहे. तपास चिखली पोलीस करीत आहेत.












