न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरास वाढत्या लोकसंख्येसोबत पाण्याची गरज देखील वाढत आहेत. परंतु, यासाठी जिल्ह्यात धरण बांधण्यासाठी एकही साईट शिल्लक नाही.
त्यामुळे या दोन्ही शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी टाटाचे मुळशी धरण हाच एक पर्याय असून, या संदर्भात चर्चा सुरु असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे विभागातील सर्व जिल्ह्याचा सन २०२० – २५ या वर्षांचा जिल्हा नियोजना संदर्भात आढावा बैठक सोमवारी (दि. २७) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाला उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी वरील माहिती दिली.











