न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२०) :- अहमदाबाद येथून निघालेल्या सोन्याच्या व्यापा-याचा पिंपरीपर्यंत दुचाकीवरून पाठलाग केला. व्यापारी थांबलेल्या लॉजमध्ये जाऊन एकदा लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
त्यानंतर, दुस-या दिवशी व्यापारी सहा लाख ८० हजार रुपयांचे सोने आणि पैसे घेऊन जात असताना त्याची बॅग पाच जणांनी मिळून हिसकावून नेली. या अट्टल चोरट्याला पिंपरी-चिंचवड विशेष तपास पथकाने (एसआयटी) अहमदाबाद येथून अटक केली आहे.
चोरट्याकडून २१० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मोरण्या जप्त करण्यात आल्या आहेत. रोहित ऊर्फ कालू दलपत घमंडे (वय ३०, रा. छारानगर, कुबेरनगर, अहमदाबाद, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.