न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून माहे जानेवारी २०२० अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या १३ तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या २ अशा एकूण १५ कर्मचा-यांचा सत्कार सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला.
कै. मधुकर पवळे सभागृह, मनपा मुख्य प्रशासकीय इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदि उपस्थित होते.
महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये लेखाधिकारी अमृता लागू, लेखापाल मंगला चौधरी, कार्यालयीन अधिक्षक सदानंद ब्रम्हे, मुख्याध्यापक रेखा खैरे, निर्मल उगले, लिपिक मोहन एकबोटे, सहाय्यक शिक्षक इंदिरा भोले, उपशिक्षक स्वाती काळबांडे, फायरमन नसिर शेख,
रखवालदार रमेश जगताप, मजूर भागवत घाडगे, शिवाजी देशपांडे, सफाई सेवक रमेश घावरी, सफाई कामगार शकुंतला जगताप, गटरकुली सुरेश गोसावी यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.















