न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रुवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रिय परिसरातील विविध अडचणी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली ड क्षेत्रिय कार्यालयांमधील सभागृहात आज सकाळी ११:०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस शिवसेना गटनेते राहूल कलाटे, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्य संदिप कस्पटे, सागर आंगोळकर, नगरसदस्या आरती चोंधे, ममता गायकवाड, रेखा दर्शले, प्रभारी प्रभाग अधिकारी सिताराम बहुरे, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, देवण्णा गट्टूवार, प्रमोद ओंबासे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले संबंधित उपअभियंता उपस्थित होते.
सदर बैठकीत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी ड प्रभागातील रस्ते दुरुस्ती, सुरळीत व समप्रमाणात पाणीपुरवठा तसेच आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करणेसाठी संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या.