न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रुवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन दिनांक ४ मार्च २०२० ते ८ मार्च २०२० अखेर करण्यात येणार असून सांगवी येथील नियोजित स्थळी या जत्रेचे नियोजन चांगल्या प्रकारे व सुसज्जपणे होणेकामी महापौर उषा उर्फ माई ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी प्रत्यक्ष पवनाथडी जत्रा स्थळाची पाहणी केली.
यावेळी त्यांचे समवेत महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्या आरती चोंधे, सहा. आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले, सहा. समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे तसेच स्थापत्य, विदुयत व प्रभागातील संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी मैदानाची समक्ष पाहणी करून मैदानाचे सपाटीकरण, विद्युत व्यवस्था, कार्यक्रमाचा मांडव, साऊंड सिस्टीम, इत्यादी स्थापत्य, पाणी पुरवठा, विद्युत विषयक कामकाज, करणेबाबत संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपली कामे चोखपणे पार पाडावीत अशा सूचना दिल्या.